WhatsApp Icon
+91 7038577577
ashishbhojane149@gmail.com

Cash Flow: व्यवसायातील ‘कॅश फ्लोचे’ महत्व

2021-06-06

व्यवसायात काही शब्द नेहमी कानावर पडले जातात जसे कि, कॅश फ्लो, कॅश फ्लो स्टेटमेंट, बिझनेस लोन, फंड फ्लो, इनकमिंग कॅश, आउटगोइंग कॅश, कॅश मुव्हमेंट, प्रॉफीट, लॉस, नो प्रॉफीट – नो लॉस इ. शब्दांना व्यवसायात स्वतःचे असे महत्व आहे. प्रत्येक व्यावसायिकाला या शब्दांबद्दल माहित असले पाहिजे म्हणून या लेखात आपण कॅश फ्लो विषयी सविस्तर माहिती घेऊया.

Black and white photo of wooden blocks spelling TAX next to a calculator on a desk

Details

कोणत्याही कंपनीचेव्यवसायाचे एकूणच भले सुरू आहे का नाहीयाचा चटकन अंदाज घ्यायचा असल्यास कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात याची यादी केली तर कॅश फ्लो’ या संकल्पनेचे स्थान उच्च आहे.

·        कंपनीचा कॅश-फ्लो किती सुरळीत आहे यावरून कंपनीचे अर्थकारण समजण्यास अधिक मदत होते.

·        व्यवसायात उत्पादन विक्रीच्या किंवा सेवेच्या बदल्यात पैसा येतो, परंतु पैसे उत्पादन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये खर्च होतात म्हणजेच व्यवसायातून पैसे जातात.

·        व्यवसायात दररोज पैश्यांची आवश्यकता असते. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे लागतात. अशा प्रकारे ज्या प्रमाणात पैशाची आवश्यकता पूर्ण केली जाते त्याला कॅश फ्लो म्हणतात.

·        कॅश-फ्लो म्हणजेच कंपनीमध्ये पैसा कोणत्या मार्गाने येतो आहेजातो आहे म्हणजेच पैशाच्या विनियोगाची आणि कंपनीकडे येणाऱ्या पैशाची आकडेवारी समजते.

·        बऱ्याचदा लोक बोलतात कि, अरे यार पैसा माझ्या हातात टिकत नाही, कुठून येतो आणि कुठे जातो हे समजत नाही. पैसा माझ्या हाताचा मळ झालाय. माझ्या पैशाला पाय लागलेत ते माझ्याजवळ थांबतच नाही. या सगळ्या गोष्टी कॅश फ्लो प्रकारात मोडतात.

·        कॅश फ्लो हि एक फायनान्शियल संज्ञा आहे. हे मुळात एक प्रकारचे स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंट मध्ये व्यवसायातील पैसा कुठून येतो आणि कुठे जातो. पैसे किती येत आहेत आणि पैसे किती जात आहेत या सर्व गोष्टी अतिशय सोप्या मार्गाने दर्शविल्या जातात या विषयी माहिती असते.

·        नित्य व्यवहारांमध्ये वेगवेगळ्या मार्गाने रोख रक्कम व्यवसायात येत असते आणि रक्कम व्यवसायाबाहेर जात असते. म्हणजेच रोकड येणे अर्थात इन-फ्लो आणि पैसे द्यावे लागले की आउट-फ्लो हे समजून घ्या.

 

व्यवसायात येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशाचे प्रकार :-

कोणत्याही व्यवसायात येणारा पैसा आणि जाणारा पैसा असे दोनच मार्ग आहेत.

१.      इनकमिंग कॅश

२.      आउटगोइंग कॅश

इनकमिंग कॅश –

व्यवसायातील सर्व स्त्रोतांकडून येणाऱ्या पैशांना इनकमिंग कॅश म्हणतात. यामध्ये उत्पादन विक्रीसाठी प्राप्त केलेली रक्कम, सेवेसाठी प्राप्त केलेली रक्कम, कोणत्याही प्रकारच्या कर्जाची रक्कम समाविष्ट आहे. यालाच Cash generated from operation of business असे देखील म्हणले जाते.

आउटगोइंग कॅश –

व्यवसायातील खर्च झालेल्या कोणत्याही रकमेस आउटगोइंग कॅश म्हणतात. यामध्ये भाडे, कर्जावरील व्याज आणि कोणत्याही प्रकारच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेली रक्कम याला आउटगोइंग कॅश म्हणतात.

कॅश फ्लो तीन प्रकारचे असतात –

·        सकारात्मक कॅश फ्लो (Positive Cash Flow) - जेव्हा व्यवसायाला खर्चापेक्षा जास्त नफा होतो तेव्हा त्याला पॉझिटिव्ह कॅश फ्लो असे म्हणतात.

·        नकारात्मक कॅश फ्लो (Negative Cash Flow) - जेव्हा व्यवसायात खर्च जास्त असतो आणि नफा कमी होतोतेव्हा त्याला नकारात्मक कॅश फ्लो म्हणतात.

·       ब्रेक इवन कॅश फ्लो (Break Even Cash Flow) - जेव्हा व्यवसायामध्ये तोटा होत नाही किंवा नफा बराचसा राखला जात नाही, तेव्हा त्याला ब्रेक इव्हन कॅश फ्लो असे म्हणतात.

 

पुढील गोष्टींवरून व्यवसायात कॅश फ्लो चे महत्व किती आहे ते समजेल –

   ·      प्रत्येकाला पैशांची गरज असते. व्यवसाय मोठा किंवा लहान असू द्या तो पैशाच्या मदतीशिवाय पुढे जाऊ शकत नाही.            व्यवसायात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यवसायात सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह कॅश फ्लो जितका जास्त         असेल तितका तो चांगला आहे. सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह कॅश फ्लो व्यवसायामध्ये आत्मविश्वास वाढवतो आणि         व्यवसाय पुढे जाण्याच्या दिशेने असतो. व्यवसायात सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह कॅश फ्लो असे दर्शवितो कि                व्यवसाय नफा कमवीत आहे.

·        ऑपरेटिंग कॅश-फ्लो म्हणजे कंपनीच्या मुख्य व्यवसायातून कंपनीला किती रोकड मिळालीकंपनीला व्यवसाय करण्यासाठी किती रोकड वापरावी लागलीवस्तूंचे उत्पादन करणेविक्री करणे यासाठी लागणारा खर्च आणि वस्तूंची विक्री करून जे रोख पैसे मिळतात यातून जी आकडेवारी मिळते ती ऑपरेटिंग कॅश फ्लो म्हणून ओळखली जाते. यावरून काय समजते याचे एक उदाहरण घेऊ समजा एका कंपनीने अल्पकाळात अधिक विक्री केली पण ती विक्री उधारीवर केली असेल तर विक्री तर वाढली पण रोख रक्कम काही हाती पडली नाही. म्हणजेच कॅश फ्लो तयार झाला नाही फक्त व्यवसाय वाढला.

·        नवीन आणि लहान व्यवसायात अनेकदा पैशांची अडचण येते हि एक सामान्य गोष्ट झाली आहे, कारण बहुतेक व्यवसाय आणि कंपन्यांकडे रिझर्व्ह कॅश फंड नसतात. अशा परिस्थितीत आर्थिक समस्या आल्याने अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर येतात. अशा परिस्थितीत कॅश फ्लो अर्थात रोख प्रवाहासाठी व्यावसायिक लोन म्हणजेच बिझनेस लोन खूप महत्वाचे असते. व्यावसायिक लोन किंवा बिझनेस लोनच्या मदतीने व्यावसायिक, व्यापारी त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकतात.

·        जर कंपनीने एखाद्या वित्त वर्षांत एखादी नवी यंत्रसामुग्रीजागा तत्सम विकत घेतली असेलएखादी जुनी गुंतवणूक विकली असेल तर त्यातून जो पैसा मिळतो तो कंपनीच्या मुख्य व्यवसायातून मिळालेला नसतो. म्हणजे समजाएखाद्या कंपनीचा नफा वाढलेला दिसलापण कॅश फ्लोमध्ये कंपनीने आपली एक मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा विकून पैसे कमावले आहेत असं समजलं तर त्या वर्षांत अचानकपणे झालेला घसघशीत नफा हा चांगला व्यवसाय करून झालेला नाही तर गुंतवणूक विकून आलेल्या पैशामुळे झालेला आहे हे चटकन लक्षात येते.

·        व्यवसायात नफा किंवा तोटा होण्याची स्थिती चिंताजनक असते. अशा परिस्थितीत व्यवसायाच्या रणनितीकडे लक्ष देणे फार महत्वाचे असते. अन्यथा परिस्थितीचे केव्हा एखाद्या नुकसानीत रुपांतर होईल ते सांगता येणार नाही.

·        कंपनीने आपल्या भागधारकांना लाभांश दिलानव्याने दीर्घकालीन कर्जे उभारलीजुन्या कर्जाची परतफेड केली यासाठी जी रोख रक्कम वापरली गेली त्याचा समावेश यात होतो. जर एखादी कंपनी नियमितपणे भागधारकांना लाभांश देत असेलआपल्याकडे असलेले पैसे नवनवीन उद्योगांमध्ये गुंतवत असेल तर ते हितावह समजले जाते.

·        आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच १ एप्रिल २०१९ या दिवशी कंपनीच्या खात्यावर किती रुपये रोख होते आणि आर्थिक वर्षांच्या शेवटी ३१ मार्च २०२० रोजी कंपनीच्या खात्यावर किती रुपये शिल्लक होते हे मांडल्यावर वर्षभरात पैसे जाणे आणि येणे हे कोणत्या कोणत्या बाबींवर खर्च झाले याची सविस्तर नोंद कॅश फ्लोमध्ये केली जाते.

·    कोणत्याही व्यवसायात नकारात्मक कॅश फ्लो (Negative Cash Flow) असणे फार धोकादायक आहे. नकारात्मक कॅश फ्लो म्हणजे नफा न मिळवता केवळ पैशांची गुंतवणूक केली जाते. अशा परिस्थितीत व्यवसायाच्या रननितीकडे किंवा नियोजनाकडे लक्ष देणे आवश्यक असते. जर नवीन मशिनरीची आवश्यकता असेल तर ती व्यावसायिक कर्जाद्वारे विकत घ्यावी परंतु कोणत्याही स्थितीत व्यवसायाचा नकारात्मक कॅश फ्लो असू नये.

·        जर कंपनीने एखाद्या वित्त वर्षांत एखादी नवी यंत्रसामुग्रीजागा तत्सम विकत घेतली असेलएखादी जुनी गुंतवणूक विकली असेल तर त्यातून जो पैसा मिळतो तो कंपनीच्या मुख्य व्यवसायातून मिळालेला नसतो. म्हणजे समजाएखाद्या कंपनीचा नफा वाढलेला दिसलापण कॅश फ्लोमध्ये कंपनीने आपली एक मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा विकून पैसे कमावले आहेत असं समजलं तर त्या वर्षांत अचानकपणे झालेला घसघशीत नफा हा चांगला व्यवसाय करून झालेला नाही तर गुंतवणूक विकून आलेल्या पैशामुळे झालेला आहे हे चटकन लक्षात येते.

·        एखाद्या कंपनीच्या दीर्घकालीन वाटचालीचा विचार करता कंपनीला किती नफा होईल याचे भाकीत वर्तवणे तसे कठीण. उपलब्ध असलेल्या पाच ते सात वर्षांच्या आकडेवारीवरून आपल्याला याचा अंदाज नक्कीच बांधता येतो की कंपनीकडे आपल्या नियमित गरजा भागवण्यासाठी पुरेशी रोकड उपलब्ध होते का?  जर होत नसेल तर ती कशामुळे होत नाहीयाचा शोध घेता येतो. कंपनी वारंवार आपल्याकडच्या गुंतवणुकी व मालमत्ता विकून पैसे उभे करत असेल तर त्यामागे काही ठोस कारण आहे कातसे कारण कंपनीकडून दिले गेले नसल्यास एकूणच कारभार बेभरवशाचा आहे असा अंदाज नक्कीच लावता येतो. दर वेळच्या आर्थिक तरतुदींसाठी रोकड नाही म्हणून कर्ज उभारणे ही कंपनीची प्रवृत्ती असेल तर दीर्घकालीन वृद्धीच्या दृष्टीने ती योग्य नाही हे कॅश-फ्लोवरून सहज लक्षात येईल.

 

ⓒ आशिष भोजने (कर सल्लागार)

सदर लेख अर्थसाक्षर.कॉम येथे दि.०५ जुन २०२१ रोजी पूर्वप्रकाशित

Contact Us

Working with Ashish Bhojane & Co.

  • Commitment to Excellence: We prioritize delivering solutions that maintain the highest standards of quality and precision.
  • Transparency and Integrity: Building trust and maintaining clear, open communication is at the core of our approach.
  • Cost Efficiency: Our solutions help reduce operational costs by optimizing resources and minimizing inefficiencies.
  • Streamlined Business Operations: By handling key aspects of your business needs, we allow you to focus on your core competencies and growth.
  • Compliance Assurance: We ensure your organization remains up-to-date with all regulatory requirements, mitigating risk and ensuring smooth operations.