Flat Rate Interest फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी...
कज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग बॅलन्स व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

Details
फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी...
कज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग बॅलन्स व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
फ्लॅट व्याजदर म्हणजे काय?
Ø कर्जरकमेवर कर्जाच्या पूर्ण कालावधीसाठी लावला जाणारा व्याजदर म्हणजेच “फ्लॅट व्याजदर’ होय.
रिड्युसिंग व्याजदर म्हणजे काय?
Ø कर्जदार करत असलेली परतफेड लक्षात घेऊन, कर्जाच्या शिल्लक रकमेवर लावण्यात येणारा व्याजदर म्हणजे ‘रिड्युसिंग व्याजदर’होय.
फ्लॅट व्याजदराच्या पडद्यामागची भामटेगिरी आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया.
· स्वतःची कार घेण्याचे स्वप्न पाहणारा माझा मित्र निलेश एक चांगला व्यावसायिक आहे. निलेश व्यावसायिक असून कधी इनकम टैक्स रिटर्न भरत नव्हता. त्याचा असा समज होता कि,माझा व्यवसायातील नफा करपात्र उत्पन्नापेक्षा कमी असल्यामुळे मला आय टी रिटर्न फाईल करण्याची गरज नाही. जरी रिटर्न फाईल भरली तरी त्याचा काही कुठे उपयोग होणार नाही.
· एके दिवशी कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानी कार लोन घेण्याचा विचार केला व बँकेत जाऊन कर्जासाठी मागणी करू लागला परंतु बँकेत त्याला कर्जासाठी त्याचे उत्पन्न दर्शविणारे नफा तोटा पत्रक, ताळेबंद व इनकम टैक्स रिटर्न फाईल नसल्याने त्याला कर्ज देण्यास बँकेने नकार दिला
· अशातच त्याला एका फायनान्स कंपनी मधून कर्ज घेण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीचा फोन आला व १२% व्याजदराने ४ लाख २४ हजार रुपयांचे ४८ महिन्यांसाठी अक्षरशः एका दिवसात त्याचे कर्ज मंजूर होऊन त्याने त्याचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. परंतु इतके साधे, सोपे वाटणाऱ्या कर्ज व्यवहारात निलेश पुरता फसवला गेला होता.
· काही उत्पन्नाचे कागदपत्रे नसताना फक्त बँक स्टेटमेंट व आधार कार्ड,पॅन कार्ड,फोटो च्या आधारे १२ % व्याजदराने मिळालेले कर्ज साधे सोपे वाटत असताना स्वस्त वाटणारा व्याजदर हेच फसवणुकीचे कारण एक वर्षानंतर निलेशच्या समोर आले.
· निलेशला सांगितलेला व्याजदर हा फ्लॅट (Flat Rate Interest) स्वरूपाचा होता, तो रिड्युसिंग (Reducing Balance Interest Rate ) स्वरूपाचा नव्हता.
· व्यावसायिक असून देखील आर्थिक व्यवहारांची माहिती न करून घेतल्याने त्याने खोलात जाऊन त्या लोन देणाऱ्या फायनान्स च्या प्रतिनिधीला विचारले नाही व त्या फायनान्स च्या प्रतिनिधीने देखील सांगितले नाही.
· ४ वर्ष मुदतीसाठी १२% फ्लॅट व्याजदर (Flat Rate Interest) म्हणजे तो खरा २२ % येत होता म्हणजेच जिथे रु.11166/- च्या समान हफ्त्यात निलेश चे काम भागणार होते तिथे रु.१३०७३/- हफ्ता निलेश भरत होता.
· यामुळे त्याला या व्यवहारात रु.91598/- चा तोटा किंवा आर्थिक नुकसान सहन करावे लागले. हे जेव्हा लक्षात आले तेव्हा वेळ तर निघून गेली होती.
· निलेश ज्या फ्लॅट व्याजदराला बळी पडला त्याच्या पडद्यामागील भामटेगिरी सध्या प्रचंड प्रमाणात सोकावली आहे. त्यामुळे फ्लॅट व्याजदराची संपूर्ण माहितीच तुम्हाला या फसवेगिरी पासून वाचवू शकणार आहे.
· फ्लॅट व्याजदर हा सिंपल इंटरेस्ट या प्रकारात मोडतो. फ्लॅट व्याजदराचा इएमआय काढताना मूळ कर्ज रकमेवर, कर्जाच्या एकूण मुदतीसाठी व्याज आकारले जाते.
निलेशच्या उदाहरणावरून -
· रु. ४ लाख २४ हजार x १२ टक्के व्याजदर x ४ वर्ष मुदत = रु.२०३५२०/- इतके फ्लॅट दराने व्याज येते.
· हे व्याज रु.२०३५२०/- अधिक मुद्दल रु.४२४०००/- मिळवले कि, रु.६२७५२०/- एकूण परतफेडीची रक्कम ४८ महिने कालावधीसाठी येते म्हणजेच ४८ महिन्यांसाठी रु.६२७५२० या रकमेला ४८ महिन्यांनी भागले तर रु.१३०७३/- इतका इएमआय दरमहा निलेशच्या खात्यातून कट होत होते.
वरील निलेशच्या उदाहरणावरून Flat Interest Rate फ्लॅट व्याजदरासंबंधी लक्षात आलेल्या काही महत्वाच्या गोष्टी -
· फ्लॅट व्याजदर कर्ज प्रकारात दरमहा इएमआय/हफ्ता भरून देखील व्याज कमी होत नाही.
· फ्लॅट व्याजदराने भरलेल्या हप्त्यांमुळे लोन रक्कम कमी होत असून देखील त्याचा कोणताच विचार फ्लॅट व्याजदरात व्याज काढताना केलेला नाही.
· दर महिना रु.१३०७३/- इतकी इएमआय रक्कम भरून देखील व्याज कमी होत नाही.
· शिल्लक रकमेवर म्हणजेच रिड्युसिंग balans वर व्याज आकारायला हवे परंतु फ्लॅट व्याजदरात एकूण कर्ज रकमेवर व्याज आकारले गेले
· रिड्युसिंग व्याजदर हा फ्लॅट व्याजदरापेक्षा जवळपास दुप्पट असल्याने १२% फ्लॅट व्याजदर सांगून २२% रिड्युसिंग व्याजदरानुसार कर्ज वसूल केले गेले.
· फ्लॅट व्याजदराने काढलेले व्याज हे साधे व्याज (simpal interest) च्या सूत्राने काढले जाते.
· साधे व्याजाचे सूत्र = मुद्दल x व्याजदर x मुदत
· फ्लॅट व्याजदरानुसार रु.२०३५२०/- इतके व्याज भरावे लागले व रिड्युसिंग व्याजदराने रु.१११९२२/- इतके व्याज भरायला आले असते. त्यामुळे रु.९१५९८/- चा आर्थिक तोटा झाला.
· वेळेवर आय टी रिटर्न फाईल न केल्यामुळे राष्ट्रीयकृत बँका कर्ज नाकारतात त्यामुळे आपण अश्या फायनान्सच्या जाळ्यात सहज कोणीही सापडून जातो. त्यासाठी वेळेवर आय टी रिटर्न फाईल करावी ज्यात व्यवसायाला तोटा किंवा नुकसान झाले असेल तरीही व्यवसायाचे उत्पन्न दर्शविणारे नफा तोटा पत्रक, ताळेबंद व इनकम टैक्स रिटर्न फाईल करणे फायद्याचे आहे.
आपले स्वप्न पूर्ण करून मजेत जगण्यासाठी आवश्यक पैसे खर्च करावेतच, पण आपल्यात आर्थिक निरक्षरता असल्याने आपला कष्टाचा पैसा वाया जातो आणि पैसा वाया गेला कि दुःख होते. आणि अशी भामटेगिरी सध्या प्रचंड प्रमाणात सोकावली असल्याने या लेखाच्या माध्यमातून अर्थसाक्षर.कॉम च्या वाचकांमध्ये आर्थिक जागरूकता निर्माण होईल व वाचक ‘अर्थसाक्षर’ होतील हि अपेक्षा....
- आशिष भोजने
- करसल्लागार, पुणे
- +91-7038577577
Working with Ashish Bhojane & Co.
- Commitment to Excellence: We prioritize delivering solutions that maintain the highest standards of quality and precision.
- Transparency and Integrity: Building trust and maintaining clear, open communication is at the core of our approach.
- Cost Efficiency: Our solutions help reduce operational costs by optimizing resources and minimizing inefficiencies.
- Streamlined Business Operations: By handling key aspects of your business needs, we allow you to focus on your core competencies and growth.
- Compliance Assurance: We ensure your organization remains up-to-date with all regulatory requirements, mitigating risk and ensuring smooth operations.